New Delhi News : दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या (Kejriwal Government) अडचणी वाढतच आहेत. मद्य अबकारी घोटाळ्यानंतर आणखी एक मोठा घोटाळा झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नायब राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली फार्मास्युटिकल सायन्स अॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटीत (Pharmaceutical Science and Research University) झालेल्या प्राध्यापक भरतीत अनियमितता झाल्याच्या तक्रारीची दखल घेत व्ही. के. सक्सेना (Delhi LG V K Saxena) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्ली फार्मास्युटिकल सायन्स अॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटीने २०१९ मध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापकाच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर पदभरतीत अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत ६ नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यानंतर नायब राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले.
दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी मुख्य सचिवांचा प्रस्तावाचा स्वीकार करून सात दिवसांच्या आत नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षता विभागाच्या अहवालानुसार, भरती प्रक्रियेत ज्या ६ उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी बनावट कागदपत्रे दिली होती, असे चौकशीत आढळून आले. या पदांसाठी लागणारी अहर्ता नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत इतक्या मोठ्या प्रमाणात अनियमितता ही विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या माहितीविना शक्य नाही, असेही अहवालात नमूद केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.