Delhi Hit And Run Case: भरधाव कारची बाइकला धडक; जखमी तरुणाला 3 किमीपर्यंत फरफटत नेले, धक्कादायक VIDEO व्हायरल

Delhi Crime News: या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Hit And Run Case Video) सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Delhi Hit And Run Case
Delhi Hit And Run CaseSaam Tv
Published On

Delhi News: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) हिट अॅण्ड रन प्रकरण (Hit And Run Case) समोर आले आहे. एका भरधाव कारने बाइकला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेमध्ये (Car And Bike Accident) बाइकवरील एक तरुण रस्त्यावर पडला. तर दुसरा तरुण कारच्या छतावर पडला. असे असताना देखील या कार चालकाने कार थांबवली नाही. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत या तरुणाला फरफटत नेले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Hit And Run Case Video) सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Delhi Hit And Run Case
NCP New President: पवारांचा उत्तराधिकारी कोण? विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल? पक्षाच्या घटनेत काय आहे तरतुद?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॅनॉट प्लेसजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. 30 एप्रिलला मध्यरात्री 12.55 च्या दरम्यान हा अपघात झाला. सीपीला लागून असलेल्या कस्तुरबा गांधी मार्गावर एका कारचालकाने बाइकला धडक दिली. या बाइकवर दोन भाऊ प्रवास करत होते.

कारने धडक दिल्यानंतर एक भाऊ रस्त्यावर दूर जाऊन पडला. तर दुसरा भाऊ कारच्या छतावर पडला. या अपघातानंतरही चालकाने कार थांबवण्याऐवजी ती चालवतच राहिला. एका प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कारच्या छतावर तरुण असताना देखील आरोपी कारचालक तीन किलोमीटरपर्यंत कार वेगाने चालवत राहिला. त्यानंतर आरोपीने दिल्ली गेटजवळ कारच्या छतावरील तरुणाला खाली फेकून दिले आणि कार घेऊन फरार झाला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातामध्ये दिपांशू वर्मा (30 वर्षे) याचा मृत्यू झाला. तर त्याच्या मावशीचा मुलगा मुकल (20 वर्षे) हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी कार चालकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com