Delhi Doctro End Life Saam Tv
देश विदेश

Shocking: रुग्णालयातच वरिष्ठ डॉक्टरची आत्महत्या, ३ पानांची सुसाइड नोट सापडली; धक्कादायक कारण समोर...

Delhi Doctro End Life: दिल्लीमधील रुग्णालयामध्ये एका वरिष्ठ डॉक्टरने आत्महत्या केली. रुग्णालयातील एका खोलीत बेशुद्धावस्थेत ते आढळून आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले.

Priya More
  • दिल्लीतील सरकारी रुग्णालयात वरिष्ठ निवासी डॉक्टरची आत्महत्या

  • खोलीमध्ये आढळून आला मृतदेह

  • घटनास्थळावरून पोलिसांना ३ पानी सुसाइड नोट सापडली

  • प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज

दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. रुग्णालयामध्ये ड्युटीवर असताना या डॉक्टरने भूल देणारे इंजेक्शन घेऊन आयु्ष्य संपवलं. रविवारी सकाळी पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. सिमरप्रीत आनंद (३० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव होते. ते रुग्णालयात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. पोलिसांना डॉक्टरच्या खोलीमध्ये ३ पानी सुसाइड नोट सापडली.

प्राथमिक तपासानुसार, प्रेमप्रकरण हे आत्महत्येचे कारण असू शकते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सिमरप्रीत गेल्या ३ वर्षांपासून सिव्हिल लाइन्स येथील अरुणा असफ अली रुग्णालयाच्या भूलशास्त्र विभागात कार्यरत होते. जेव्हा पोलिस रुग्णालयामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना, भूलशास्त्र विभागात एसआर म्हणून कार्यरत असलेले डॉ. सिमरप्रीत सिंग आनंद हे ड्युटी रूम क्रमांक १०९ मध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आले. डॉ. सिमरप्रीत सिंग आनंद हे पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी होते.

डॉ. सिमरप्रीत ४ आणि ५ जुलैच्या रात्री रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत रात्रपाळीवर होते. ड्युटी रूमला आतून कुलूप लावण्यात आले होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर डॉक्टर सिमरप्रीत यांना आपत्कालीन विभागात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत डॉक्टरच्या डाव्या हातात कॅन्युला टाकण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजता मृताच्या विनंतीवरून एका तंत्रज्ञ सहाय्यकाने हा कॅन्युला टाकला होता. पोलिसांच्या पथकाला खोलीत सिरिंज आणि औषधांच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या.

डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्याच्या काळ्या बॅगेतून एक सुसाईड नोट आणि डायरी सापडली. ३ पानी सुसाईड नोटमध्ये डॉक्टरने आपण आत्महत्या का करतोय यामागचे कारण सांगितले. त्याने या सुसाईड नोटमध्ये एका महिला डॉक्टरसोबतच्या आपल्या प्रेमसंबंधांचाही उल्लेख केला आहे ज्या गेल्या दोन वर्षांपासून त्याच रुग्णालयातील भूलशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. महिला डॉक्टर मध्य प्रदेशातील जबलपूरच्या रहिवासी आहेत. डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ते वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही.' याच विवंचेतून डॉक्टरने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वांगणीजवळील कुडसावरे पूल पाण्याखाली, उल्हास नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ

Rainy Season : पाऊस सुरू होताच लाईट का जाते? कारण काय तुम्हाला माहितीये?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला?

Shocking : भयंकर! पत्नीने पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, रूमचा दरवाजा बंद केला अन्...

महिनाभर भात खाणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT