विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने सासरा बनला अडथळा
भररस्त्यात पेट्रोल टाकून आग लावली
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अटकेत
तामिळनाडूमध्ये एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे प्रेमप्रकरणात सासरा अडथळा बनत असल्याने महिलेने आणि तिच्या प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकनंदन (बदलेलं नाव ), जयप्रिया (बदलेलं नाव) असे आरोपीचं नाव आहे. माणिकनंदन आणि जयप्रिया या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. जयप्रिया ही आधीच विवाहित होती. जयप्रियाच्या सासऱ्यांना तिच्या प्रेमसंबंधाबद्दल समजले होते. तिच्या सासऱ्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला. माणिकनंदन आणि जयप्रिया या दोघांच्या नात्यात जयप्रियाचे सासरे अडथळा ठरत होते.
यामुळे या दोघांनी मिळून त्यांना मारण्याचा कट रचला. कदमपुलीयुर पोलिस स्टेशन परिसरातील मालिगमपट्टू गावातील रहिवासी राजेंद्रन (जयप्रियाचे सासरे) यांना काही तरुणांनी भर रस्त्यात गाठले. दोन हल्लेखोर व्हॅनमधून उतरले आणि त्यांनी राजेंद्रनवर पेट्रोल टाकले आणि त्याला आग लावली. त्यानंतर त्यांनी कंदनला घाबरवले आणि ते घटनास्थळावरून पळून गेले.
रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूने राजेंद्रन यांना वाचवले आणि उपचारासाठी पनरुती सरकारी रुग्णालयात नेले, त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कुड्डालोर सरकारी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक (एसपी) एस. जयकुमार यांनी एका पथकासह घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला. डीएसपी पी.एन. राजा यांच्या नेतृत्वाखालील चार विशेष पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित आरोपींनी धक्कादायक खुलासा केला. आरोपींनी दिलेल्या जबाबानुसार, राजेंद्रन यांच्या सुनेचा आणि तिच्या प्रियकराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या दोघांना देखील बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.