Crime News Saam Tv
देश विदेश

Crime: दोन पुरुष पतीसोबत ठेवत होते संबंध, पत्नीनं पाहिलं; दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह बेडमध्ये आणि मग..

Gay Relationship Exposed: पती समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे पाहताच पती आणि त्याच्या २ साथीदारांनी मिळून पत्नीची हत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

पती समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे पाहताच पती आणि त्याच्या २ साथीदारांनी पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने पतीला आणि इतर दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. ज्यामुळे त्यांचे बिंग फुटले. त्यामुळे तिघांनी मिळून महिलेची हत्या केली आणि मृतदेह बेडमध्ये लपवले.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली आहे. मात्र, पती फरार आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील विवेक विहारमधील सत्यम एन्क्लेव्हमधील एका घरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी शाहदरा येथील एका फ्लॅटमध्ये अंजू उर्फ अंजलीचा कुजलेला मृतदेह ब्लँकेटमध्ये आढळला होता. मृतदेहाचा वास येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. अतिरिक्त उपायुक्त नेहा यादवने सांगिकले की, फ्लॅटच्या आत बेडमध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. घरमालकाची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने दिलेले उत्तर संशयास्पद वाटू लागले. यावेळी घरमालकाची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने महिलेची हत्या केली असल्याचे सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी फ्लॅट मालक विवेकानंद मिश्रा आणि अभय कुमार झा या आरोपींना अटक केली आहे. महिलेचा पती अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली ही पतीसोबत दिल्लीत राहत होती. काही दिवसांपूर्वी तिने पती, घरमालक आणि एकाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर ती घर सोडून गेली.

पंजाबमधील लुधियाना येथे गेल्यावर पती पुन्हा तिला घ्यायला घरी गेला. नंतर सासरी दिल्लीत आल्यानंतर तिघांनी मिळून तिची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला. या प्रकरणाची माहिती मिळताच २ आरोपींना अटक केली असून, फरार पतीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT