Delhi Crime News Saam TV
देश विदेश

Delhi Honest Thieves : बंदुकीच्या धाकावर जोडप्याला लुटायला आले, अचानक चोरातील 'माणूस' जागा झाला; पुढे काय झालं? पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

New Delhi News : चोर म्हटलं की क्रूर, असंवेदनशील अशी प्रतिमा समोर येते. कारण चोर चोरी करताना लोकांच्या परिस्थितीचा अजिबात विचार करत नाही. लोकांनी आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या पैशांवर, वस्तूंवर एका क्षणात डल्ला मारून पसार होतात.

मात्र एखाद्या चोराची माणूसकी चोरी करताना अचानक जागी झाली तर तो काय करेल? याची प्रचिती दिल्लीतील एका जोडप्याला आली आहे. चोरी करायला आलेल्या चोराने चक्क या जोडप्यालाच पैस दिले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या दयावान चोराला पोलिसांनी नंतर बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी रात्री 10.55 च्या सुमारास शहादरा येथील फरश बाजार येथे एक जोडपं रस्त्यावर फिरत होतं. व्हिडीओमध्ये स्कूटीवर हेल्मेट घातलेले दोन तरुण बंदुकीचा धाक दाखवत दाम्पत्याच्या जवळ आले.

चोरांनी त्यांना अडवलं आणि बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. चोरांनी या जोडप्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे केवळ 20 रुपये सापडले. त्यावेळी चोरांना काहीही न मिळाल्याने त्यांनी जोडप्यालाच 100 रुपये देऊन पळ काढला.  (Latest Marathi News)

घडलेल्या प्रकारानंतर दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३९३/३४ लुटण्याचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही घटना घडत असताना जवळच्या इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला होता. (Viral Video)

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी या चोरांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT