Arvind Kejriwal News Saam Tv
देश विदेश

Big relief Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, CM पदावरून हटवण्याची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Rohini Gudaghe

Arvind Kejriwal Arrest Update

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. वैयक्तिक हित हे राष्ट्रीय हिताच्या अधीन असलं पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने ही याचिका फेटाळताना केली आहे. (latest politics news)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ३ एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय राखून (Arvind Kejriwal Arrest Update) ठेवला. केजरीवाल यांच्या वकिलांना लेखी युक्तिवाद करण्यासाठी आजपर्यंत वेळ दिला होता. त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने फेटाळली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम आदमी पार्टीचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करत (Politics News) आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सात दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांचं वजन साडेचार किलोने कमी झालं आहे. त्यांचं कुटुंब, डॉक्टर आणि पक्ष 'वेट लॉस'मुळे चिंतेत असल्याचं आपच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं (Delhi High Court) होतं. संजय सिंह यांचा पक्ष सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच प्रकरणात ईडीने अटक केली आहे.

केजरीवाल १५ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात ( CM Arvind Kejariwal) आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील याच प्रकरणात तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांना सलग 9 वेळा समन्स पाठवल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT