Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Tv

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची आज ईडी कोठडी संपणार, कोर्टात दिलासा मिळणार का?

Arvind Kejriwal ED Custody: आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपत आहे. त्यांच्या अटकेवर जर्मनी आणि अमेरिकेने आक्षेप घेतलेला आहे.
Published on

Arvind Kejriwal News Update

दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने २२ जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक (Arvind Kejriwal News Update) केली होती. त्यानंतर त्यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपणार आहे. (latest politics news)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुपारी अडीच वाजता राउस एव्हेन्यू कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. न्याय निष्पक्ष आणि पारदर्शक असावा, अशी मागणी अमेरिकेने केली होती. जर्मनीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या अटकेवर तीव्र आक्षेप घेतला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काल दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामिनासाठी दिलासा दिला नव्हता. आज केजरीवाल यांची कोठडी संपत आहे. परंतु ईडी पुन्हा कोठडीची मागणी करण्याची (Arvind Kejriwal News) शक्यता आहे. केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी २२ मार्चला अटक करण्यात आली होती. आज कोर्टाकडून केजरीवाल यांना दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अमेरिकन सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली होती. तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्याबाबत “एक निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेवर कायदेशीर प्रक्रिया” सुनिश्चित करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने दिली (Arvind Kejriwal ED Custody) होती.

Arvind Kejriwal
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

या आधी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आम आदमी पक्षाच्या नेत्यांना इतर कोणत्याही भारतीय नागरिकांप्रमाणेच निष्पक्ष खटल्याचा हक्क आहे, असं म्हटलं होतं. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या दोन्ही वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेतला (Delhi CM Arvind Kejriwal) आहे.

ईडी आज अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करणार आहे. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात (Politics News) सुनावणी देखील होणार आहे. अजून दिल्ली उच्च न्यायालायाकडून अरविंद केजरीवाल यांना मद्यविक्री धोरण प्रकरणी दिलासा मिळालेला नाही.

Arvind Kejriwal
Arvind Kejariwal| केजरीवालांकडे गुन्हे शाखा अधिकारी दाखल, अधिकाऱ्यांकडून दिलेली नोटीस स्वीकारली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com