Second wife case filed against husband under Section 498A of IPC Latest News  SAAM TV
देश विदेश

Husband wife Clash: नवरा-बायकोमध्ये भांडण होणं ही मानसिक क्रूरता नाही; हायकोर्टाचं मत

Satish Daud

Delhi High Court on Husband wife Clash

नवरा बायकोमध्ये भांडण होणं, ही काही नवीन बाब नाही. किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात. तर काही वेळा ते विकापालाही पोहचतात. यातून प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. अशातच दिल्ली हायकोर्टाने नवरा-बायकोमधील भांडणाबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. नवरा-बायकोमध्ये भांडण होणं, ही मानसिक क्रूरता नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसंच जोडीदाराने जाणून-बुजून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणं ही मानसिक क्रूरता आहे, असंही मतही कोर्टाने नोंदवलं. घटस्फोट प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने दोन्ही निरीक्षणं नोदवली आहे. या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीचे १९९६ साली एका महिलेसोबत लग्न झाले होते.

लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. बायकोला माहेर राहण्यास रस नाही. ती शरीरसंबंधास नकार देते, असा आरोप करीत पतीने कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पत्नीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली. विवाहित जोडप्यांमध्ये होत असलेली चिडचिड किरकोळ वाद आणि विश्वासाचा अभाव याला मानसिक क्रूरता म्हणता येणार नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली.

त्याचबरोबर पत्नीविरुद्ध पतीच्या याचिकेवर घटस्फोट मंजूर करणारा कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. जोडीदाराने जाणून बुजून शरीरसंबंधासाठी नकार देणं, ही मानसिक क्रूरता आहे. अशी टिप्पणी देखील हायकोर्टाने सुनावणीवेळी केली. अशा नाजूक विषयाला सामोरं जाताना कनिष्ठ न्यायालयाने सावधगिरी बाळण्याची गरज असल्याचं कोर्टाने म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT