Sonia Gandhi and Rahul Gandhi  saam tv
देश विदेश

राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

delhi high court notice rahul gandhi sonia gandhi national herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह सात जणांना नोटीस बजावली आहे. ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास राऊज एव्हेन्यू कोर्टानं नकार दिला होता.

Nandkumar Joshi

  • नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची दिल्ली हायकोर्टात याचिका

  • सोनिया गांधी आणि राहुल गांधींना हायकोर्टाची नोटीस

  • ईडीने दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती याचिका

  • राऊज एव्हेन्यू कोर्टानं दिला होता ईडीच्या चार्जशीटची दखल घेण्यास नकार

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं या दोन्ही नेत्यांसह सात जणांना नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वीच राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला होता. ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टानं नकार दिला होता.

राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह सात जणांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ मार्च २०२६ रोजी होणार आहे. सुनावणीवेळी ईडीकडून दिल्ली हायकोर्टात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, ५० लाख रुपयांच्या बदल्यात आरोपींना दोन हजार कोटींची मालमत्ता प्राप्त झाली आहे असा अंतिम निष्कर्ष निघालेला आहे. जून २०१४ रोजी एका व्यक्तीकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्याची कनिष्ठ न्यायालयाकडून दखल घेण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिली होती. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात आली. पुरावे गोळा केले. आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले, अशी माहिती मेहता यांनी कोर्टात दिली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयानं मोठी चूक केली आहे. हे फक्त एका प्रकरणाविषयी नाही. याचा परिणाम इतर अनेक प्रकरणांवर होऊ शकतो. कारण न्यायालयानं वैयक्तिकरित्या केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे तर त्यावर ईडी काही करू शकत नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने नमूद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT