ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

money laundering case : सक्तवसुली संचालनालयानं गुरुवारी पीएसीएल आणि अन्य प्रकरणांत चौकशी सुरू असतानाच पंजाबच्या लुधियानामध्ये साधारण साडेतीन हजार कोटींच्या १६९ मालमत्ता जप्त केल्या आहेत.
ed action in punjab ludhiana
ed action in punjab ludhianasaam tv
Published On
Summary
  • ईडीची सर्वात मोठी कारवाई

  • मनी लाँड्रिंग प्रकरणात ३५०० कोटींच्या मालमत्ता जप्त

  • पंजाबच्या लुधियानामध्ये १६९ मालमत्तांवर टाच

  • लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पंजाबमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे. पीएसीएल (PACL) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेनं गुरुवारी शेकडो मालमत्तांवर टाच आणली आहे. पीएसीएल आणि अन्य प्रकरणांत चौकशी सुरू असतानाच पंजाबच्या लुधियानातील ३४३६.५६ कोटी रुपये किंमत असलेल्या १६९ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. लाखो गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशांमधील काही भाग पीएसीएलच्या नावाने या १६९ मालमत्ता खरेदीसाठी वापरला गेल्याचं चौकशीतून समोर आले आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले.

सक्तवसुली संचालनाच्या दिल्ली विभागीय कार्यालयातील पथकाने या मालमत्तांवर पीएमएलए २००२ अॅक्ट अंतर्गत जप्तीची कारवाई केली आहे. सीबीआयकडून पीएसीएल लिमिटेड, पीजीएफ लिमिटेड, दिवंगत निर्मल सिंह भंगू आणि अन्य व्यक्तींच्या विरोधात आयपीसी १८६० अन्वये कलम १२०- ब आणि ४२० अंतर्गत दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.

ed action in punjab ludhiana
'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

काय आहे नेमकं प्रकरण?

हे प्रकरण पीएसीएलद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या योजना आणि सामूहिक गुंतवणूक योजनांशी संबंधित आहे. या योजनांच्या माध्यमातून पीएसीएल आणि तिच्याशी संबंधित इतर कंपन्यांनी भूलथापा देत गुंतवणूकदारांकडून जवळपास ४८ हजार कोटी रुपये जमा करून ते हडपले. ईडीने आतापर्यंत या प्रकरणात ५६०२ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात देशविदेशातील मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय या प्रकरणात तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

ed action in punjab ludhiana
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com