Unnao Case update  Saam tv
देश विदेश

Unnao Case : बलात्कार प्रकरणात भाजपच्या माजी आमदाराला दिलासा; हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

Unnao Case update : उन्नव प्रकरणातील आरोपी भाजपच्या माजी आमदाराला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

Vishal Gangurde

उन्नाव अत्याचार प्रकरणात सेंगरला दिलासा

सेंगरच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

कोर्टाकडून सेंगरला जामीन मंजूर

उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे.

कोर्टाने आदेशात सेंगरला दिलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. सेंगरला १५ लाखांचा वैयक्तिक जात मुचलका आणि तिघांच्या जामिनीवर सोडलं आहे. कोर्टाने सेंगरला जामीन देताना काही अटी देखील घातल्या आहेत. जामिनानुसार, सेंगरला पीडित मुलीच्या घराच्या 5 किलोमीटरच्या हद्दीत जाता येणार नाही.

तसेच सेंगरला आता त्याचा पासपोर्ट देखील कोर्टात जमा करावा लागणार आहे. त्याला प्रत्येक सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर कोर्टाने सेंगरला पीडित कुटुंबाला न धमकावण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

उन्नाव बलात्कार प्रकरण हे २०१७ सालातील आहे. उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीने तत्कालीन भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरवर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचे दिसलं. तर तिने मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता. पीडित मुलीचा संशयास्पद अपघात झाल्यानंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती.

सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेपानंतर संपूर्ण प्रकरण दिल्ली हस्तांतरित केलं. या प्रकरणी २०१९ साली दिल्लीतील कोर्टाने कुलदीप सेंगरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर २५ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. सेंगरने मिळालेल्या शिक्षेविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. याच याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सेंगरला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

SCROLL FOR NEXT