खतिब घराण्याची ६५ वर्षांची सत्ता उलथवणारी ३० वर्षीय डॉक्टर तरुणी आहे तरी कोण? नवनिर्वाचित नगराध्यक्षांची राज्यभर चर्चा

Akola politics : खतिब घराण्याची ६५ वर्षांची सत्ता ३० वर्षीय डॉक्टर तरुणीने उलथवून लावली आहे. या तरुणीची राज्यभरात चर्चा सुरु आहे.
Akola News
Akola politicsSaam tv
Published On
Summary

बाळापूर नगरपालिकेच्या निकालाची राज्यभर चर्चा

३० वर्षीय डॉक्टर तरुणीने लावला खतिब कुटुंबाच्या गडाला सुरुंग

1927 मतांनी विजय मिळवत ३० वर्षीय तरुणी नगराध्यक्षपदावर विराजमान

अक्षय गवळी, साम टीव्ही

राज्यातील सर्व निकालांमध्ये लक्षवेधी निकाल लागला तो बाळापूर नगरपालिकेचा... बाळापूर नगरपालिकेतील खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवत डॉ. आफरीन परवीन मोहम्मद जमीर या तिशीतील तरुणीने इतिहास घडवलाय. डॉ. आफरीन परवीन यांनी बाळापूरच्या नगराध्यक्ष पदावर 1927 मतांनी विजय मिळवलाय.

डॉ. आफरीन परवीन यांनी वंचित बहुजन आघाडी प्रणित नगर विकास पक्षाच्या उमेदवार रजिया बेगम खतीब यांचा पराभव केलाय. यासोबतच 25 सदस्यांच्या नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेसह 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलेय.

Akola News
विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

1934 मध्ये बाळापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून खतीब घराण्यातून प्रत्येक नगरपालिकेत सदस्य राहिलाय. गेल्या 65 वर्षांपासून माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या चार पिढ्यातील सदस्य बाळापूरचे नगराध्यक्ष राहिले आहेत.

नातिकोद्दीन खतीब यांचे आजोबा, वडील, स्वत: नातिकोद्दीन खतीब, पत्नी रजिया बेगम आणि मुलगा ऐनोद्दीन यांनी आत्तापर्यंत बाळापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेय. याही निवडणुकीत नातिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष रजीया बेगम खतीब नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या.

Akola News
ऐन निवडणुकीत शिवसेनेवर दु:खाचा डोंगर; सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

काँग्रेसची रणनीती कशी यशस्वी ठरली?

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला नाकारल्याचे निकालानंतर दिसून येते. विधानसभेत माजी आमदार नातिकोउद्दिन खतीब यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत निवडणुकही लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. नगरपालिकेत मध्येही त्यांची नगर विकास पार्टी आणि वंचितची आघाडी होती. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला.

खतीब यांना 70 हजार 349 मतांवर समाधान मानावे लागले. ते दुसऱ्या क्रमांकावर होते. आताही त्यांच्या पॅनलचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं बाळापुरात मतदारांनी काँग्रेसला साथ दिली, मात्र व्यक्तीला नाकारले काहींचे मत आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाचे 5 पैकी 4 उमेदवार मुस्लिम होते. नगर विकास पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार दिला. एमआयएमनेही निवडणूक रिंगणात उतरवला. मात्र आपले पारंपरिक मतदार फुटणार नाहीत, याची खबरदारी काँग्रेसने घेत रणनीती आखली होती.

Akola News
ऐन निवडणुकीत शिवसेनेवर दु:खाचा डोंगर; सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

कोण आहेत डॉ. आफरीन परवीन?

बाळापूरातील मोहम्मद जमीर या राजकीय घराण्याची लेक

बीएचएमएस ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली.

बाळापूरात मेडिकल प्रॅक्टिस.

वडील मोहम्मद जमीर उर्फ जम्मूसेठ यांनी बाळापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं. 2013 ते 2016 या काळात वडील बाळापूरचे नगराध्यक्ष.

वडील मोहम्मद जमीर उर्फ 'जम्मूसेठ' 1991 पासून सातत्याने बाळापूर नगरपालिकेत नगरसेवक.

आता बाळापूरच्या नगराध्यक्षपदावर विजयी.

नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारांना मिळालेली मते :

1) डॉ. आफरीन परवीन : काँग्रेस : 12744

2) रजीय बेगम खतीब : वंचित : 10817

बाळापूर नगरपालिका :

सत्ता आली : काँग्रेस आणि महाविकास आघाडी

नगराध्यक्ष विजयी उमेदवार : डॉ. आफरीन

विजयी मताधिक्य : 1927

अंतिम निकाल :

एकूण जागा : 25

घोषित : 25

वंचित 06

भाजप 01

काँग्रेस 13

उबाठा : 04

अपक्ष : 01

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com