Pooja Khedkar Case Saam Digital
देश विदेश

Pooja Khedkar: तोपर्यंत पूजा खेडकरला अटक करू नका, दिल्ली हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. 'पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करणे आवश्यक नाही.', असे हायकोर्टाने आजच्या सुनावणी दरम्यान सांगितले. 'हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये.', असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने तपास यंत्रणेला दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीची बाजू मांडली.

पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद सिंगल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने पूजा खेडकरला तात्काळ अटक करणे आवश्यक नाही असे म्हणत याप्रकरणाची २१ ऑगस्टला सविस्तर सुनावणी होणार असल्याचे सांगितले. २१ ऑगस्टला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असल्यामुळे तोपर्यंत पूजा खेडकरला दिलासा मिळाला.

पटियाला हाऊस कोर्टाने १ ऑगस्ट रोजी पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दिल्ली क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आपल्याला दिल्ली क्राईम ब्रँचने अटक करू नये यासाठी पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले. दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिस आणि यूपीएससीला नोटीस बजावली.

आता याप्रकरणावरील पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे. २१ ऑगस्टला याप्रकरणी सविस्तर सुनावणी होईल. पूजा खेडकर अटकपूर्व जामीन प्रकरणावर सुनावणीदरम्यान यूपीएससीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तीवाद केला की, 'पूजा खेडकरने आई- वडिलांचे नाव वारंवार बदलले आहे. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याची तिने चुकीची माहिती दिली. यात पूजाच्या आई-वडिलांचा देखील सहभाग आहे. ते दोघेही सोबतच राहतात.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT