पतीचे कारनामे शिल्पाला माहित नव्हते? क्राइम ब्रँच कडून फोन क्लोनिंगची तयारी

राज कुंद्रा पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी यांच्या फोनचा गुन्हा शाखेत क्लोनही केला जाऊ शकतो.
पतीचे कारनामे शिल्पाला माहित नव्हते? क्राइम ब्रँच कडून फोन क्लोनिंगची तयारी
पतीचे कारनामे शिल्पाला माहित नव्हते? क्राइम ब्रँच कडून फोन क्लोनिंगची तयारीSaam Tv
Published On

पुणे : राज कुंद्रा Raj Kundra पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांची Mumbai Police गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी Shilpa Shetty यांच्या गुन्हा शाखेत क्लोनही Clone केला जाऊ शकतो.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात खुलासे आणि चौकशी समोर येत आहेत. म्हटले जात आहे की मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता त्यांची पत्नी शिल्पा शेट्टीला पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकते.

हे देखील पहा-

अहवालानुसार, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टी यांच्या फोनचे क्लोनिंग करण्याचा विचार करीत आहेत. या प्रकरणात तिची पुन्हा चौकशी होऊ शकते. शुक्रवारी राज कुंद्राशी संबंधित असलेल्या अश्लील रॅकेटचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी शिल्पा शेट्टीचे निवेदन या प्रकरणात नोंदवला आहे.

शिल्पाला अ‍ॅपच्या कंटेंटची माहिती नव्हती ?

न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या निवेदनात पोलिस सूत्रांनी सांगितले की, शिल्पाने 'हॉटशॉट्स' साठी तयार केलेल्या कंटेंटची "पूर्णपणे अज्ञानी असल्याचा दावा केला होता. हॉटशॉट्स हा एक मोबाइल अ‍ॅप होता ज्यात तिचा नवरा राज कुंद्रावर अश्लील व्हिडिओ स्ट्रीम केल्याचा आरोप आहे.

पतीचे कारनामे शिल्पाला माहित नव्हते? क्राइम ब्रँच कडून फोन क्लोनिंगची तयारी
ऐन पुरात अंधश्रद्धेचा बाजार! जीव धोक्यात घालून अट्टहास (पहा व्हिडीओ)

शिल्पा शेट्टीने इरॉटिक कंटेन्ट बद्दल सांगितले:

शिल्पा शेट्टी यांनी आपला नवरा निर्दोष असून 'इरोटिका' आणि 'पोर्नोग्राफी' यामधील फरक सांगितला. तिने दावा केला आहे. या अ‍ॅपमधून राज कुंद्रा यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांनाही सहआरोपी बनवावे.

मुंबई पोलिसांनी 48 टीबी डेटा जप्त केला!

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टी यांच्या जुहू येथेही छापा टाकला. शिल्पाचे निवेदन नोंदवण्यासाठी आणि शिल्पा शेट्टी यांना आपल्या पतीच्या कामांबद्दल काही माहित आहे की नाही हे शोधण्यासाठी छापे टाकण्यात आले. त्याच्या घरातून पोलिसांनी छायाचित्रे आणि व्हिडिओंचा 48 टीबी डेटा ज्यात मुख्यतः अडल्ट कंटेन्ट आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com