Delhi Hit and Run  Saam Tv
देश विदेश

Video : दिल्लीत तरुणीला तब्बल १२ किमी फरफटत नेले; घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

दिल्लीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमध्ये एका भयंकर अपघाताची बातमी समोर आली

Vishal Gangurde

Delhi Crime News : दिल्लीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमध्ये एका भयंकर अपघाताची बातमी समोर आली. दिल्लीमध्ये काल कारमधून प्रवास करणाऱ्या मुलांनी एका मुलीला तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधील मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

दिल्लीमध्ये तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकारानंतर देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारने फरफटत नेणाऱ्या ५ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दिल्ली पोलिसांनी आरोपींची ५ दिवसीय पोलिस कोठडी मागितली होती. दिपक खन्ना, अमित खन्ना, कृष्ण, मिथून, मनोज मित्तल असे आरोपींचे नाव आहेत.

पोलीस अधिकारी सागर प्रीत हुड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस पीडितेच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. या प्रकरणी मेडिकल बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. तर मेडिकल बोर्डाच्या रिपोर्टवर तपास होणार आहे. या प्रकरणी लीगल टीमची देखील मदत घेऊ. तर आरोपींवर कलम ३०४, ३०४ ए, २७९, १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप

दिल्ली हिट ॲड रन प्रकरणातील एक आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी सुल्तानपुरी भागात भाजपचं लोकल लेव्हलला काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर मोंगलपुरी वार्डमध्ये लोकल वार्डचं काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. भाजपचे नेते या आरोपीला वाचवत असल्याचा आपचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT