Urfi Javed : पुण्यात उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसात तक्रार; चित्रा वाघही दणका देणार

सोशल मीडियावर बोल्ड व्हिडिओ, रील्स शेअर करणाऱ्या उर्फी जावेदच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल झाली आहे.
Urfi Javed
Urfi JavedSaam Tv

Urfi Javed News : सोशल मीडियावर बोल्ड व्हिडिओ, रील्स शेअर करणाऱ्या उर्फी जावेदच्या विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर उर्फी जावेदच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Urfi Javed
Chitra Wagh On Urfi Javed: 'ही बाई सापडेल त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन अन्...' उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या

उर्फी जावेद विचित्र कपड्यामुळे सध्या वादात सापडली आहे. उर्फी जावेदच्या बोल्ड व्हिडिओ विरोधात भाजप महिला नेत्या, चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानेही उर्फी जावेदच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीने उर्फीच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Urfi Javed
Urfi JavedSaam Tv

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्चिता जोशी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात उर्फी जावेद हिच्यावर सायबर अंतर्गत गुन्हा दखल करण्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उर्फी जावेदवर पोलिसांकडून कारवाई होणार का, हे पाहावे लागणार आहे.

Urfi Javed
Chitra Wagh On Urfi Javed | उर्फी जावेदवर चित्रा वाघ भडकल्या, उर्फी जावेद नगंटपणा करणारी बाई

दरम्यान, उर्फी जावेदच्या विचित्र कपड्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या देखील चांगल्याच भडकल्या आहेत. 'एकीकडे निष्पाप महिला विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं ट्वीट भाजप महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. यानंतर आता रिपाईंकडून उर्फी जावेदवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com