दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपले इन्स्टाग्राम अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटावर निशाणा साधत, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर इतकेही झुकू नका की, एक दिवस भारतात फक्त त्यांचेच खाते चालवण्याची वेळ येईल," अशी टीका केली. त्यानंतर केजरीवाल यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे, याबाबत कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, मेटाकडून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट केवळ भारतात बंद करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय का घेण्यात आला, याबाबत कोणतीही अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही. तसेच त्यांनी पाठवलेल्या ई-मेललाही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल ई-20 पेट्रोलच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात ई-20 इंधनामुळे वाहनांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सरकारने हा अहवाल मागे घेण्यासाठी सियामवर दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांवर केंद्र सरकार किंवा सियामकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यापूर्वीही केजरीवाल यांनी सुमारे 100 कार्यकर्त्यांसह पंतप्रधान निवासाकडे मोर्चा काढला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह रोड परिसरात त्यांना अडवले. ई-20 पेट्रोलविरोधातील आंदोलन पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.