Manish Sisodia granted interim bail for 3 days to attend nieces wedding sbk90 Saam Tv
देश विदेश

Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांना पहिल्यांदाच मोठा दिलासा, दारू घोटाळ्यात मिळाला अंतरिम जामीन

Delhi Excise Policy Scam: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात जवळपास वर्षभरापासून तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.

Satish Kengar

Manish Sisodia News:

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात जवळपास वर्षभरापासून तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. तीन दिवसांसाठी ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत. दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा दिलासा देण्यात आला आहे. 13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ते तुरुंगाबाहेर राहणार आहेत.

सिसोदिया यांनी आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राऊस एव्हेन्यू न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. त्यांच्या भाचीचे लखनौमध्ये 14 फेब्रुवारीला लग्न आहे. मनीष सिसोदिया यांच्या याचिकेला ईडीने विरोध केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र न्यायालयाने सिसोदिया यांची याचिका मान्य करत त्यांना तीन दिवसांसाठी लखनौला जाण्याची परवानगी दिली. अटकेनंतर सिसोदिया तुरुंगाबाहेर रात्र काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, मनीष सिसोदिया यांना सीबीआयने गेल्या वर्षी 26 फेब्रुवारी रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. सिसोदिया गेल्या वर्षभरापासून तिहार तुरुंगात आहेत.

त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आला होता. पत्नीच्या आजारपणाचे कारण देत त्यांनी दिलासाही मागितला होता. मात्र अलीकडेच त्यांना आठवड्यातून एकदा पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT