Delhi Election Result 2025 saam tv
देश विदेश

Delhi Election Result 2025 : भाजपने दिल्लीचा किल्ला जिंकला; आपचा 'झाडू'न पराभव

Delhi Election Result update : भाजपने दिल्लीचा किल्ला जवळपास जिंकला आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालाने दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाचा झाडून पराभव केला आहे. दिल्लीमधील एकूण ७० जागांपैकी जवळपास भाजपने ३९ जागा जिंकल्या आहेत. तर ९ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे 'आप'ने १७ जागा जिंकल्या आहेत. तर आता आप ५ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भाजपने आतापर्यंत ३९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता निश्चित झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भारतीय जनता पक्ष जवळपास ४८ जागांवर जिंकत आहे. मागील एका दशकापासून सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्ष फक्त २२ जागांवर जिंकत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्यासहित आपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं आहे.

आपच्या मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तर जंगपुरामधून माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीतील पराभव माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपच्या सुशासन आणि विकासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपची सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरु झाली आहे. भाजप २७ वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. भाजप दिल्लीत ७० पैकी ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर 'आप' फक्त २२ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६०.५४ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार मैदानात उतरले होते. या निवडणुकीच्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपने तब्बल २७ वर्षानंंतर दिल्लीचा किल्ला जिंकला आहे. भाजपच्या विजयानंतर आता दिल्लीत मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची पहिली झलक; चक्क लोगो बदलला, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

SCROLL FOR NEXT