Earthquake Saam Digital
देश विदेश

Delhi Earthquake: ऐन दिवाळीत दिल्लीत पुन्हा भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये घबराट

Earthquake News: ० ते १.९ रिश्टर स्केलचा भूकंप फार सौम्य असतो. त्यामुळे तो फक्त सिस्मोग्राफद्वारे ओळखला जाऊ शकतो.

Ruchika Jadhav

Delhi News:

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. शनिवारी दुपारी ३.३६ वाजता भूकंपाचे धक्के जावणले असून २.६ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तिव्रता आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असताना एन दिवाळीत भूकंपाचे हादरे बसलेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

दुपारच्यावेळी नागरिक आपआपल्या कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागले. भूकंप आल्याचं समजतात नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पळ काढला. आपल्या लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना घेऊन नागरिक मोकळ्या जागी येऊन थांबले. झालेल्या भूकंपामुळे दिल्लीमध्ये उत्साहाऐवजी सर्वांच्या मनात भीती आणि तणाव आहे.

दिल्लीमध्ये एकाच महिन्यात दोनवेळा भूकंप झालेत. याआधी ६ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे झटके बसले होते. त्यावेळी ५.६ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीशिवाय उत्तराखंडमध्येही या भूकंपाचे पडसाद उमटले होते.

किती रिश्टर स्केलने काय परिणाम होऊ शकतो?

० ते १.९ रिश्टर स्केलचा भूकंप फार सौम्य असतो. त्यामुळे तो फक्त सिस्मोग्राफद्वारे ओळखला जाऊ शकतो.

२ ते २.९ रिश्टर स्केलवरील भूकंपाचेही सौम्य धक्के जाणवतात.

३ ते ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप होतो तेव्हा आपल्या शेजारून एखादा ट्रक गेल्यासारखे जाणवते.

४ ते ४.९ रिश्टर स्केलवर भूकंप झाल्यास खिडकीच्या काचा फुटू शकतात. तसेच भींतीवरील वस्तूही पडतात.

५ ते ५.९ रिश्टर स्केलवर भूकंप झाल्यास फ्रिज, कपाट आणि तुमच्या घरातील सर्व फर्निचर हादरू शकते.

६ ते ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप फार मोठा असतो. यामध्ये इमारतींच्या पायाला तडेही जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT