College Girl Died After Iron Rod Attack Saam Tv
देश विदेश

Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली! लग्नाला नकार दिल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, कॉलेजच्या बाहेर तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

College Girl Died After Iron Rod Attack: दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये दोन हत्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Priya More

Delhi News: राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या (Delhi Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. अशामध्ये दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये दोन हत्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत एका तरुणीची लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये (Malviya Nagar) ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतला उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरमध्ये ही घटना घडली आहे. भरदिवसा २५ वर्षांच्या एका तरुणीची डोक्यामध्ये लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मालवीय नगरमधील पार्कमध्ये या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला पण पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच त्याला अटक केली. प्रेम प्रकरणातून या तरुणीची हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान असून तो दिल्लीच्या संगम विहार परिसरात राहतो. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपीने हे भयानक कृत्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचं लग्न इरफानसोबत लावून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या तरुणीने आरोपीशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता.

हत्या करण्यात आलेल्या तरुणीने कमला नेहरु कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. ही तरुणी शुक्रवारी आपल्या फ्रेंडसोबत गार्डनमध्ये आली होती. तेव्हा तिच्या डोक्यावर रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या गार्डनसमोरच ऑरोबिंदो कॉलेज आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपी इरफानच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारीच दिल्लीमध्ये एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने स्वत:वर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. २४ तासांमध्ये घडलेल्या या दोन्ही घटनेमुळे दिल्लीतील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी २४ तासांत महिलांची हत्या होत असताना महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Metro 3 : आजपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, तिकिटी किती असणार? वाचा

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

Nanded Tourism : नांदेडमध्ये लपलाय 'हा' सुंदर किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे नक्की जा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार? खात्यात खटाखट ३००० रुपये येणार

SCROLL FOR NEXT