Delhi Crime
Delhi Crime saam tv
देश विदेश

Delhi Crime: 'स्पेशल 26' चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला अन् सीबीआय अधिकारी बनून व्यापाऱ्याला घातला लाखोंचा गंडा

Chandrakant Jagtap

Special 26 Crime Story Delhi: बॉलिवूड स्पेशल-26 चित्रपट पाहून आरोपींच्या टोळी एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाराला लुटणाऱ्या टोळीला 6 ते 7 जणांच्या टोळीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (CBI) अधिकारी म्हणून फ्लोअर मार्केटमधील एका ज्वेलर्सचे दुकान सिनेस्टाईल धाड टाकली आणि ज्वेलर्सला लाखोंचा गंडा घातला. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी या टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे.

बॉलीवूडचा स्पेशल-26 चित्रपट पाहून चोरट्यांनी करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) अधिकारी म्हणून भासवून आरोपींनी फ्लोर मार्केटमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात लूट केली. या घटनेच्या तपासात गुंतलेल्या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी या टोळीतील 4 आरोपींना अटक केली आहे.

सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून टाकली धाड

दिल्लीच्या फ्लोअर मार्केटमध्ये ज्वेलर्स म्हणून काम करणाऱ्या हरप्रीत सिंगने पोलिसांना सांगितले की, तो त्याच्या घराच्या तळमजल्यावर दागिन्यांचे दुकान चालवतो. 17 एप्रिल रोजी सकाळी अचानक 6 ते 7 लोक त्याच्या दुकानात घुसले, त्यात एक महिला देखील सामील होती. दुकानात प्रवेश करताच त्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगून येथे अवैध सोन्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगितले. तसेच दुकानदाराला तडजोड करायची असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील असे आरोपींनी सांगितले.

40 लाख रुपये रोख, अर्धा किलो सोने लुटले

हरप्रीतने या बनावट सीबीआय अधिकाऱ्यांना खरे समजले आणि त्यांना 40 लाख रुपये रोख आणि अर्धा किलो सोने दिले. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचे पाहून आरोपींनी तेथून निघताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) सोबत नेला. डीव्हीआर सोबत नेण्याच्या कृतीमुळे हरप्रीतला संशय आला आणि त्यानंतर त्याने दिल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. (Breaking News)

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक

यानंतर पोलिसांनी हरप्रीतच्या दुकानाभोवती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आणि सीसीटीव्हीमध्ये सापडलेल्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. यादरम्यान पोलिसांना समजले की आरोपींमध्ये संदीप भटनागर, पवन गुप्ता, योगेश कुमार आणि हिमांशू दिल्लीतच लपले आहेत. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून या चौघांना अटक केली. (Latest Political News)

स्पेशल-26 चित्रपट पाहून सुचली कल्पना

पोलिसांनी या चौघांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी बॉलिवूड चित्रपट स्पेशल 26 अनेकदा पाहिला आणि त्यानंतर याचप्रमाणे लूक करण्याचा कट रचल्याचे सांगितले. या टोळीचा म्होरक्या आणि सूत्रधार संदीप भटनागर होता. पोलिसांनी या आरोपींकडून 11 लाख रुपये रोख, सुमारे 100 ग्रॅम सोने आणि 5 मोबाईल फोन जप्त केले आहेत. याशिवाय वॉकी टॉकी सेट आणि दोन डीव्हीआर देखील पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहेत. सध्या पोलीस आणखी २ आरोपींचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat Lok Sabha Voting LIVE: नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलं मतदान, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT