Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

Utkarsha Rupwate Car Attack: वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.
Utkarsha Rupwate Car Attack
Utkarsha Rupwate Car AttackSaam TV

सचिन बनसोडे, साम टीव्ही शिर्डी

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, त्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.

Utkarsha Rupwate Car Attack
Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ सोमवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास घडली घटना घडली आहे. या दगडफेकीत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने या घटनेत उत्कर्षा रूपवते यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

मात्र, या घटनेनं अहमदनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या आपला प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री कारने संगमनेरकडे परतत होत्या.

यावेळी अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. कारचालकाने सतर्कता दाखवत कार थांबवली नाही. त्यामुळे या हल्ल्यातून उत्कर्षा रूपवते थोडक्यात बचावल्या.

यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी उत्कर्षा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना एका महिला उमेदवाराच्या कारवर दडफेक झाल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Utkarsha Rupwate Car Attack
Ratnagiri Lok Sabha Election 2024 Voting LIVE: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com