Gautami Patil News: शेठ, नादचं केलाय थेट! 'गावात गौतमी येतेयं, २ दिवस सुट्टी द्या...' ST कर्मचाऱ्याचं डायरेक्ट साहेबांना पत्र

Bus Worker Ask Leave For Gautami Patil Lavani Dance Program: गौतमीच्या चाहत्यांचे असंख्य किस्से ऐकले असतील | पण हा किस्सा निराळाच...
Gautami Patil News
Gautami Patil NewsSaamtv
Published On

Gautami Patil Crazy Fan Viral News: गौतमी पाटील या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते. (Lavani Dancer Gautami Patil)

गौतमीची तरुणाईमध्ये अशी काही क्रेझ आहे, ज्याची असंख्य उदाहरणे समोर येत असतात. तिची एक झलक पाहण्यासाठी गौतमीचे चाहते आतुरलेले असतात. सध्या अशाच एका गौतमी लव्हर बस कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याने चक्क गौतमीला पाहण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे, काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू.

Gautami Patil News
Maharashtra Politics: ठाकरे की शिंदे, कोणाचा व्हीप लागू होणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

गौतमीची सर्वत्र चर्चा....

लावणी कलावंत गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या महाराष्ट्राची सर्वात मोठी सेलिब्रेटी म्हणून ओळखले जाते. कार्यक्रम कुठेही असो गौतमी पाटील तिची एक झलक पाहण्यासाठी एकदम आतुर झालेले असतात. कधी झाडावर चढून, कधी घरावर बसून गौतमीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी धडपडत असतात. (Latest Marathi News)

गौतमीच्या चाहत्यांचे असंख्य किस्से सोशल मीडियावर समोर येत असतात. सध्या अशाच एका जबरदस्त गौतमी लव्हर चाहत्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चाहत्याने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजर राहण्याठी असे काही केलंय जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Gautami Patil News
Imran Khan Arrest : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, एका तासात त्यांना न्यायालयात हजर करा: पाकिस्तान सर्वोच्च न्यायालय

काय आहे नेमके प्रकरण?

सध्या एका गौतमी लव्हर एसटी कर्मचाऱ्याचे एक पत्र सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. हे पत्र आहे या कर्मचाऱ्याने मागितलेल्या सुट्टीचे. यामध्ये या एसटी कर्मचाऱ्याने गावात गौतमी पाटील येत असल्याने थेट दोन दिवसाच्या सुट्टीची मागणी केली आहे. "२२ मे ते २३ मे या दोन दिवशी गावात गौतमी पाटील येणार आहे, त्यामुळे दोन दिवसाची रजा मिळावी," असा सरळ उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

या जबरदस्त प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असून, बघा गौतमीची क्रेझ म्हणत हा रजा अर्ज माध्यमांवर शेअर केला जात आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अर्जावर गौतमी लव्हर असावा तर असा, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर एवढंही गौतमी प्रेम बरं नव्हे म्हणत त्याच्यावर टीकाही केली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..

टीका होतात वाद होतात पण गौतमीची क्रेझ मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गावात कोणताही कार्यक्रम असो आणायची तर गौतमीचं असचं काहीसं चित्र सध्या दिसत आङे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात (Pune) एका व्यक्तीने बायकोच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा डान्स ठेवला होता. तर अलिकडेच पुण्याच्या मुळशीमध्ये चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमीला आमंत्रित केले होते. थोडक्यात काय तर, सबसे कातील गौतमी पाटीलची क्रेझ म्हणजे विषयच हार्ड झाल्याचे दिसत आहे. (या, व्हायरल रजेच्या अर्जाची साम टीव्ही पुष्ठी करत नाही...)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com