Imran Khan Arrest : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, एका तासात त्यांना न्यायालयात हजर करा: पाकिस्तान सर्वोच्च न्यायालय

Imran Khan : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, एका तासात त्यांना न्यायालयात हजर करा: पाकिस्तान सर्वोच्च न्यायालय
Imran Khan Arrest
Imran Khan Arrestsaam tv
Published On

Imran Khan Arrest : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवली आहे.

इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. यावर न्यायालय गुरुवारीच निकाल देणार आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना तासाभरात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यासाठी आदर्श ठेवण्याची हीच ती वेळ असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Imran Khan Arrest
Bhagat Singh Koshyari On SC : सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले...

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशाविरोधात इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खान यांची अटक वैध ठरवणारा इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या याचिकेविरोधात पीटीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.  (Breaking Marathi News)

उच्च न्यायालयाचा हा आदेश पाकिस्तानी घटनेच्या कलम १० अ च्या विरोधात असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय विरोधाभासांनी भरलेला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. एनएबीचे अध्यक्षांनी जारी केलेले वॉरंट बेकायदेशीर आहे, असंही यात म्हटलं आहे.

कोणत्या प्रकरणी इम्रान खान यांना झाली अटक?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) आणि पाक रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून अटक केली होती. यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता.\

पाकिस्तानातील अनेक मोठ्या शहरांमध्ये इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.

Imran Khan Arrest
Sharad Pawar on Bjp : आता भाजपविरोधात प्रचार करणं सोप्पं होईल; शरद पवारांनी एका वाक्यातच राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट केली...

पाकिस्तानमधील पंजाबमध्ये गेल्या दोन दिवसांत आंदोलकांनी १४ सरकारी इमारती आणि २१ पोलिस वाहनांना आग लावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी आंदोलकांनी लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराचीही तोडफोड केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com