Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : व्हॅलेंटाईन डे आधी रूम बुक; बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये गेली, काही वेळानं अचानक तरुणीनं बाल्कनीतून मारली उडी, नेमकं काय घडलं?

Delhi Crime News : दिल्लीतील एका हॉटेलच्या बाल्कनीतून तरुणीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त होऊन तिने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील हॉटेलमध्ये तरुणीची बाल्कनीतून उडी

  • लग्नाला नकार दिल्याने वादानंतर टोकाचे पाऊल

  • दुकान कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

  • बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने हॉटेलच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळेस तिच्यासोबत हॉटेलमध्ये तिचा बॉयफ्रेंडही असल्याचं समोर आलं आहे. बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने आत्महत्येच पाऊल उचललं असल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून पोलिसांनी बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,तरुणीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी हॉटेलची रूम बुक केली होती. दोघेही ठराविक हॉटेलमध्ये दिलेल्या रूममध्ये गेले. या दरम्यान मुलीने तिच्या प्रियकराला लग्नाबद्दल विचारले असता बॉयफ्रेंडने आडमुठेपणा केला.

तरीही तरुणी तिच्या प्रियकरावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. मुलाने स्पष्टपणे नकार दिल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या रागाच्या भरात तरुणी तावातावाने हॉटेलच्या बाल्कनीत गेली. त्या बाल्कनीतून उडी मारली. नशीब बलवत्तर म्हणून हॉटेल रूमच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिकल दुकानातील एका कर्मचाऱ्याला मुलगी खाली पडत असल्याचं दिसलं.

त्याने सतर्कता राखून घटनास्थळी धावला. त्याने दुकानातून काही रिकामे पुठ्ठे काढले आणि तरुणी जिथे पडणार होती तिथे रस्त्यावर पसरवले. पुठ्ठ्यांच्या खोक्यांनी तिला थेट काँक्रीटच्या फरशीवर आदळण्यापासून रोखले आणि तिचा जीव वाचवला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु असून ती बेशुद्ध अवस्थेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT