Arvind Kejriwal News Update saam tv
देश विदेश

Arvind Kejriwal Bungalow Renovation: अरविंद केजरीवाल चौकशीच्या फेऱ्यात! मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं कॅग करणार ऑडिट

Arvind Kejriwal News Update: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jagtap

CAG to conduct special audit into Delhi CM Bungalow Renovation: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणात झालेल्या कथित अनियमिततेचे कॅग स्पेशल ऑडिट करणार आहे. या दरम्यान बंगल्याच्या नूतनीकरणातील कथित अनियमिततेची सर्व बाजूंनी चौकशी केली जाणार आहे.

या ऑडिटदरम्यान सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणातील अनियमितता आणि उल्लंघनाची विशेष चौकशी होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 6, फ्लॅग स्टाफ रोड, सिव्हिल लाइन्स, दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणात प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेचे विशेष ऑडिट करतील. यासंदर्भात केंद्राने कॅगला केलेल्या विनंतीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उपराज्यपाल सचिवालयाने केलेल्या शिफारशीनंतर कारवाई

उपराज्यपाल सचिवालयाने 24 मे 2023 रोजी केलेल्या शिफारशीनंतर गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. एलजी कार्यालयाने 24 मे रोजी केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याच्या नूतनीकरणाशी संबंधित खर्चाशी संबंधित प्रकरणावर कॅगद्वारे विशेष ऑडिट करण्याची शिफारस केली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणात आर्थिक अनियमितता झाल्याची चर्चा होती. (Marathi Tajya Batmya)

बंगल्याच्या नूतनीकरणात अनियमितता?

दिल्लीच्या उपराज्यपालांनी मुख्य सचिवांच्या अहवालाचा हवाला देत पीडब्ल्यूडी विभागाने नूतनीकरणाच्या नावाखाली बंगला बांधल्याचे म्हटले आहे. तसेच बांधकाम सुरू करण्यापूर्वी पीडब्ल्यूडीने मालमत्तेची मालकी निश्चित केली नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत समितीकडूनही अनिवार्य आणि पूर्वआवश्यक मान्यता घेण्यात आलेल्या नाहीत, असाही आरोप अहवालात करण्यात आला आहे. (Latest Political News)

भाजप आणि काँग्रेसकडून गंभीर आरोप

या अहवालानुसार बंगल्याच्या बांधकाम कामाचा प्रारंभिक खर्च जो वेळोवेळी वाढत 15-20 कोटी रुपये होता. तो आतापर्यंत एकूण खर्च सुमारे 53 कोटी रुपये झाला आहे, जो प्रारंभिक अंदाजापेक्षा तिप्पट असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर 45 कोटी रुपये खर्च झाले असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, तर काँग्रेसने 171 कोटी खर्च झाल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत कोविड काळात लोक ऑक्सिजन आणि बेडसाठी तरसत होते, तेव्हा हा खर्च करण्यात आला असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

SCROLL FOR NEXT