Buldhana News: बकरी ईदला मुस्लिम बांधव कुर्बानी देणार नाहीत; सामाजिक एकोप्यासाठी अनोखा निर्णय

यंदा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला कुर्बानी देणार नसल्याची ठराव मंजूर केला आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

Buldhana News: येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी मुस्लिम बांधवांची बकरी ईद सुद्धा साजरी होणार आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. एकादशीला हिंसा नसते, तर बकरी ईदला कुर्बानी दिली जाते. मात्र, यंदा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा ठराव मंजूर केला आहे. (Latest Marathi News)

हिंदू-मुस्लिम बांधावातील सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी बुलढाणा एसपी सुनील कडासने यांनी मुस्लिम बांधवांना 29 जूनला कुर्बानी न करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील दरगाह मशीद ट्रस्टने मोठा ठराव केला आहे. मुस्लिम बांधवांनी 29 जूनला देऊळगावराजा शहरात मुस्लिम बांधव कुर्बानी करणार नाही, असं पत्र देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिले आहे.

Buldhana News
Solapur Bakri Eid | बकरीईदच्या कुर्बानीसाठी बाजारात तब्बल 4 लाखांचा बकरा, पाहा हा खास रिपोर्ट

देऊळगावराजा शहराच्या मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी देखील याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे.

नंदूरबार जिल्यातील मुस्लिव बांधवांनी जपला एकोपा

संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा प्रत्यय आला आहे. जिल्ह्यातील बारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी येत आहे.

यामुळे यादिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. मुस्लिम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देणार असल्याने या निर्णयाने दोघे समाजांमध्ये बंधूभाव वाढीस प्रेरणा मिळणार आहे.

Buldhana News
Bakri Eid 2022 : चर्चा तर हाेणारच ! बक-याच्या कपाळावर अर्धचंद्रकोर; बाजारात खाताेय भाव (व्हिडिओ पाहा)

जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी हा निर्णय घेतला गेल्याने येत्या काळात जिल्ह्यात सामाजिक एकात्मता कायम राहण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या वतीने यासाठी गावनिहाय शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यात एकादशी आणि बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

त्यासोबत पोलिसांचे सोशल मीडिया या माध्यमांवर लक्ष असून अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com