Delhi CM Arvind Kejriwal Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal Arrest: अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी; हायकोर्टात जनहित याचिका

Petition in HC For Arvind Kejriwal To Step Down From The Post Of Delhi's CM: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, तसेच कोर्टातूनच सरकार चालवण्याची तयारी सुरू केली आहे. याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Delhi CM Arvind Kejriwal

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, तसेच कोर्टातूनच सरकार चालवण्याची तयारी सुरू केली आहे. याविरोधात हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरजीत सिंह यादव यांच्या वतीने उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

आप सरकारमधील मंत्री आतिशी यांनी, तुरुंगातून सरकार चालवता येत नाही असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल हेच दिल्ली यापुढेही मुख्यमंत्री असतील असं म्हटलं होतं. दिल्लीचे विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनीही, केजरीवाल यांनीच तुरुंगातून सरकार चालवावं, असं संपूर्ण पक्षाचं मत आहे. तरीही गरज पडली तर आतिशी आणि आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज ही दोन नावं आहेत, जी गरज पडल्यास हे पद सांभाळू शकतात असं म्हटल्याची सूत्रांची माहिती होती. त्यामुळे भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तिने महत्त्वाच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं याचिकेत म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आज अरविंद केजरीवाल यांना राऊज इव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणाची सुनावणी कोर्टात पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा आजचा मुक्काम कोठडीतच असण्याची शक्यता आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती नातेवाईकांना दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. असे सांगत अटकेसंदर्भात २८ पानांची कागदे ईडीकडून न्यायालयाला सुपुर्त करण्यात आली. तसेच या सगळ्या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार अरविंद केजरीवाल आहेत. या घोटाळ्यातून झालेल्या पैशाचा वापर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी केला गेला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT