Sharad Pawar News: सत्ता स्थापनेची शर्यत! 'इंडिया आघाडी'चा मास्टरप्लान काय? शरद पवारांनी थेट सांगितलं
Loksabha Election Result 2024: SAAM TV
देश विदेश

Sharad Pawar News: सत्ता स्थापनेची शर्यत! 'इंडिया आघाडी'चा मास्टरप्लान काय? शरद पवारांनी थेट सांगितलं

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ५ जून २०२४

देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना सहकारी पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. अशातच इंडिया आघाडीही सत्ता स्थापनेच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. दिल्लीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

"राज्यात आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला. आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलण झालं नाही. पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आहे. सत्तेसाठी नंबर आहेत की नाही ही गोष्ट टाळू शकत नाही, तिकडे ध्यान दिलं पाहिजे मात्र सध्यातरी यावर चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

"नितीश कुमार यांच्याबाब मला माहित नाही. ते एनडीए सोबत राहणार असल्याचे म्हणालेत असे स्टेटमेंट मी वाचलं. आमच्या बैठकीत जी रणनीती ठरेल त्यातून आम्ही पुढे जाऊ. सध्यातरी मी कोणाशीही बोललो नाही. निकालानंतर आमची पहिली मीटिंग आहे. रणनिती जाईल. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत चर्चा करणे योग्य नाही," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी राज्यातील महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि महायुतीच्या पराभवावरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. उत्तर प्रदेशातील मला माहित नाही. पण महाराष्ट्रातील लोकांमधे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाराजी होती. महागाई, बेरोजगारी असे मुद्दे होते. त्यावर जनता नाराज होती. त्याचीच ही रिअँक्शन आहे असे मला वाटते, असा दावाही शरद पवार यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT