Pooja Khedkar Case Saam Digital
देश विदेश

Pooja Khedkar News: पूजा खेडकरला मोठा दिलासा! अटकेपासून पुन्हा संरक्षण; कोर्टाने काय म्हटलं? वाचा....

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २१ ऑगस्ट २०२४

वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आज पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने अटक करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पूजा खेडकरला सर्वोच्च दिलासा!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अटकेपासून संरक्षण

मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने पूजाला 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण विचाराधीन असताना पूजाला तत्काळ अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलं होते. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीवेळी कोर्ट पूजाचा अटकपूर्व जामीन मंजूर करत की फेटाळत याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले आहे.

दरम्यान, पूजा खेडकरच्या जामीनाला युपीएससीने विरोध केला होता. या प्रकरणी UPSCकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. पूजाला जामीन देऊ नये कारण तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करणे आवश्यक आहे. पूजा खेडकरला बनावट कागदपत्रे बनवून २०२२ च्या IAS परीक्षेत निवड होण्यासाठी कोणी मदत केली हे तिला अटक केल्यानंतरच कळू शकेल. आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी या प्रकरणी चौकशी करावी लागेल, असे या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

Salman Khan: 'भाईजान'च्या जीवाला धोका? अज्ञात व्यक्तीने सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक दिला राजीनामा; फेसबुकवर पोस्ट करत सांगितलं कारण

work pressure synonyms : वर्कलोड वाढलाय? आत्महत्येचा विचार मनात येण्याआधी वाचा कामाचा ताण दूर कसा करावा

Flower Pot: घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका फ्लॉवर पॉट, होईल मोठं आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT