Delhi Kalkaji Temple News Saam TV
देश विदेश

Breaking News: देवीचं जागरण सुरू असताना मंदिरातील स्टेज कोसळला; महिलेचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO समोर

Delhi Breaking News: दिल्लीतील कालकाजी माता मंदिरातजागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १७ भाविक जखमी झाले आहेत.

Satish Daud

Delhi Kalkaji Temple News

देवीचं जागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १७ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात शनिवारी (२७ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मृत महिलेचं वय ४५ वर्ष असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Police) आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील (Delhi) कालकाजी मंदिरात शनिवारी (२७ जानेवारी) रात्रीच्या सुमारास देवीच्या जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिरातील लाकडी स्टेज कोसळला. स्टेज कोसळत असल्याचं लक्षात येताच भाविकांनी मंदिरातून बाहेर पडण्यास सुरूवात केली. मात्र, या घटनेत अनेक भाविक जखमी झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, एका ४५ वर्षीय महिलेला डॉक्टरांन तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयोजकांवर गुन्हा दाखल केला. देवीच्या जागरणासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक भाजपाचे धैर्यशील कदम विजयी

Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

SCROLL FOR NEXT