punjab  Saam tv
देश विदेश

Petrol-Diesel Restriction : १५ वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Delhi pollution News : १५ वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे.

Vishal Gangurde

दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंह सिरसा यांनी प्रदुषण रोखण्याठी मोठा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून दिल्लीत १५ वर्षे जुन्या वाहनांना पंपावर पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर दिल्लीचे पर्यावरण मंत्री सिरसा यांनी निर्णयाविषयी माहिती दिली. या बैठकीत प्रदूषण रोखण्याविषयी सविस्तर चर्चा झाली.

सिरसा यांनी बैठकीनंतर म्हटलं की, 'प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुन्या वाहनांना दिल्लीत कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. १५ वर्ष जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत इंधन मिळेल. त्यानंतर त्यांना इंधन मिळणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक पथक नेमलं आहे. हे पथक १५ वर्ष जुने वाहन शोधण्याचं काम करेल. पेट्रोल पंपावर गॅझेट लावण्यात येईल, ते १५ वर्ष जुन्या वाहने शोधण्याचे काम करेल. दिल्लीत कुठेही १५ वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही.

सिरसा यांनी पुढे सांगितलं की, 'वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात येणार आहे. यात दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. पुढे म्हणाले, 'विद्यापीठासोबत मिळून एक अशी व्यवस्था तयार करु, या अभियानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरीत करू. जेणेकरून सरकारच्या प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात लाभ होईल'.

या व्यतिरिक्त दिल्ली सरकारने प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांना (हॉटेल, ऑफिस कॉम्प्लेक्स) प्रदूषण रोखण्यासाठी गॅझेट आणि अँटी स्मॉगगन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उंच इमारती, हॉटेल आणि कर्मशियल कॉम्प्लेक्समध्येही अँटी स्मॉगगन लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळामुळे प्रदूषण होत आहे का, याबाबतही डाटा काढण्यात येत आहे. दिल्ली विमानतळाला देखील प्रदूषण रोखण्यासाठी योगदान द्यावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?

Pune Ganpati Visarjan: लेझर लाईटवर बंदी, ढोल-ताशा अन्..., विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

Ladki Bahin Yojana: शासनाच्या यादीत नाव पण लाडकींच्या घराचे पत्ते खोटे, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून धक्कादायक माहिती उघड

Beed Crime: अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार; प्रकरण मिटवण्यासाठी मुंडे-कराडची मध्यस्थी

Box Office Collection: 'परम सुंदरी'ची बंपर कमाई; 'कुली' आणि 'वॉर 2'च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात, जाणून घ्या कलेक्शन

SCROLL FOR NEXT