Delhi Poll Of Polls Results  Saam Tv
देश विदेश

Delhi Poll Of Polls Results : कोणाचा होणार सुपडासाफ, कोणाच्या हाती येणार दिल्लीची सत्ता?

Poll Of Polls Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मतदानानंतर पोल ऑफ पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, कोणाकडे सत्ता जाणार याचा अंदाज बांधला जात आहे.

Yash Shirke

Delhi Election 2025 : आज दिल्लीमध्ये विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यत ५७.७० टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. ६ वाजेपर्यंतही काही दिल्लीकरांनी मतदान केले. मतदानानंतर दिल्ली कुणाची याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोल ऑफ पोलच्या आकड्यांनुसार, भारतीय जनता पार्टीने दिल्लीचा गड जिंकला आहे.

मॅट्रीझच्या पोलनुसार, दिल्लीमध्ये भाजपला ३५-४० जागा मिळणार आहेत, तर ३२-३७ जागांवर आपचे उमेदवार निवडून येतील. काँग्रेसला फक्त एक जागा मिळू शकते. चाणक्य स्टॅटजीच्या नुसारे, ३९-४४ जागांवर भाजपचा विजय होईल, तर २५-२८ जागा आपला मिळतील. काँग्रेसला २ ते ३ जागांवर समाधान मानावे लागेल. पोल डायरीच्या मते, दिल्लीतील ७० जागांपैकी ४२-४५ जागा भाजप, १८-२५ जागा आप आणि १-२ जागा काँग्रेसला मिळतील.

पोल ऑफ पोल्सच्या अनुसार, काँग्रेसला दिल्ली विधानसभेत मोठा पराभव होणार आहे. दिल्लीत भाजप आपचा पाडाव करणार आहे. केंद्रात आणि दिल्लीत भारतीय जनता पार्टीची सत्ता असणार आहे. हे आकडे जरी भाजपकडे झुकत असले तरीही ८ फेब्रुवारीला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हाच दिल्ली आपकडे राहणार की भाजपाकडे जाणार हे स्पष्ट होईल.

दिल्लीत २०१५ पासून आम आदमी पक्षाची सत्ता आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते. दारु घोटाळ्यामध्ये त्याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे ९ वर्ष ७ महिन्यांनी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आपच्या आतिशी मार्लेना यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT