Arvind Kejriwal ON RSS BJP:  Saamtv
देश विदेश

Arvind Kejriwal News: भाजप- आरएसएस वाद, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल; मोहन भागवतांना विचारले ५ रोखठोक सवाल

Gangappa Pujari

Arvind Kejriwal Speech: आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आप नेत्या आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या मोठ्या निर्णयानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्लीतील जंतर मंतरवर आम आदमी पक्षाने 'जनता की अदालत' कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांना सभेला संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

'4 एप्रिल 2011 हा दिवस होता जेव्हा अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली. आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवत होतो आणि जनतेला सुविधा दिल्या. मोफत वीज, मोफत पाणी, महिलांसाठी मोफत बस. ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा करण्यात आली. रुग्णालये, मोहल्ला दवाखाने आणि उत्कृष्ट शाळा बांधल्या. 10 वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर नरेंद्र मोदींना वाटू लागले की जिंकायचे असेल तर प्रामाणिकपणावर प्रहार केला पाहिजे. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. आमच्या मंत्री आणि नेत्यांना निवडक तुरुंगात टाकण्यात आले, असा घणाघात अरविंद केजरीवाल यांनी केला.

मोहन भागवंत यांना ५ सवाल..

१. “पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांचे नेते फोडत आहेत आणि संपूर्ण देशाला आमिष दाखवून किंवा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) यांचा धाक दाखवून सरकार पाडत आहेत. हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगले आहे का? हे भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे यावर मोहन भागवतांचा विश्वास नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

२. भ्रष्ट नेत्यांच्या भाजप प्रवेशावरुनही केजरीवाल यांनी सवाल उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांचा आपल्या पक्षात समावेश केला आहे. मोदी आणि अमित शहा यांनी ज्या नेत्यांना आधी भ्रष्ट म्हटले, त्यांचा नंतर भाजपमध्ये समावेश करण्यात आला. तुम्ही अशा भाजपची कल्पना केली होती का? आरएसएसला हा प्रकार मान्य आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

३. तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल म्हणाले की, भाजपचा जन्म आरएसएसच्या पोटातून झाला आहे, आणि भाजपने योग्य मार्गावर जाण्याची जबाबदारी आरएसएसची आहे. “तुम्ही कधी मोदीजींना चुकीच्या मार्गावर जाऊ नका असे सांगितले आहे का? भाजपच्या आजच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात का? असा सवालही केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुखांना विचारला.

४. केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यात त्यांनी म्हटले होते की भाजपला आता आरएसएसची गरज नाही, असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. यावरुनही केजरीवाल यांनी सवाल केला. "आरएसएस ही भाजपच्या आईसारखी आहे. तुमच्याच 'मुलाने' असे म्हटल्यावर तुम्हाला दुःख झाले नाही का? यामुळे संघाचे कार्यकर्ते दुखावले नाहीत का?, असं ते म्हणाले.

५. आरएसएस आणि भाजपने बनवलेल्या 75 वर्षांच्या निवृत्ती नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवाल म्हणाले, "या नियमानुसार लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारखे ज्येष्ठ नेते निवृत्त झाले होते, पण आता अमित शहा म्हणत आहेत की हा नियम आहे. मोदीजींना लागू होणार नाही का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? 'हे' काम लगेच करा

Monsoon Return Rain : मराठवाडा-विदर्भाला परतीच्या पावसाने झोडपलं; जायकवाडी धरणाचे तब्बल 22 दरवाजे उघडले

Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप

Maharashtra Politics : विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, शिंदे गट, अजिदादांना किती जागा मिळणार?

Maruti Brezza Car: एक नंबर! फक्त २ लाख रुपयात घरी आणा Maruti Brezza कार

SCROLL FOR NEXT