मुंबई : उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील आनंदेश्वर मंदिराबाहेर एका कारस्वाराने साधू दाम्पत्याला चिरडलं, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय. मृत्यूची माहिती मिळताच आजूबाजूचे आणि मंदिरातील लोक घटनास्थळी पोहोचले होते. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली येथील आनंदेश्वर मंदिर परमात येथे ही धक्कादायक घटना घडलेली आहे. घटनेनंतर कानपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जवळपासचे सीसीटीव्ही स्कॅन करण्यास सुरुवात केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मृत पती-पत्नी मंदिराबाहेर भीक मागून उदरनिर्वाह करत (Uttar Pradesh) होते. आज पहाटे मंदिरात आलेल्या कारस्वाराने त्यांना जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या भीषण अपघातावेळी उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो तेथून फरार झाला. या घटनेत या दाम्पत्याचा मृत्यू झालाय.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे आणि मंदिरातील लोक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चौकशी आणि शोध घेऊन आरोपींना लवकरच अटक केली (Accident News) जाईल, अशी माहिती दिलीय. आज २१ सप्टेंबर रोजी सकाळी एक व्यक्ती परमात येथील बाबा आनंदेश्वर मंदिरात मंगला आरतीसाठी गेला होता. तेथून परतत असताना तो गाडी रिव्हर्स घेत होता, तेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेले पती-पत्नी (निर्भय चंद उर्फ सीताराम आणि त्यांची पत्नी शांती देवी) यांना धडक बसली. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते.
या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून कारस्वार घटनास्थळावरून पळून (husband wife killed in) गेलाय. घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे. मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला दोघांचे रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले होते. या घटनेनंतर मंदिरातील साधूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. कार चालकाने चुकून या दोघांना धडक (Car Accident) दिली, त्यामुळे त्याने जखमी पती-पत्नींना रुग्णालयात नेवून त्यांच्यावर उपचार करायला हवे होते, परंतु त्याने तसे केले नाही. त्यांना तिथेच सोडून पळ काढला. सध्या ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.