Delhi Minor Rape Case Saam Tv
देश विदेश

Delhi Minor Rape Case: दिल्लीत शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांकडून 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

दिल्लीत शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांकडून एका 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांकडून एका 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत (Delhi 8 Year Old Girl Was Raped By Two Minors Who Lived In Neighbor).

पोलिसांनी सांगितले की, त्यांनी या घटनेसंदर्भात दोन अल्पवयीन (Minor) मुलांना अटक केली आहे. अधिकृत माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाने (DCW) मंगळवारी पोलिसांना नोटीस बजावली असून, एफआयआर आणि अटक केलेल्या आरोपींबाबत तपशीलवार माहिती मागवली आहे.

बलात्कार करणारे माणूस असू शकत : महिला आयोग अध्यक्षा

महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, “आठ वर्षांच्या मुलीवर क्रूरपणे बलात्कार (Rape) झाला, तिला अकल्पनीय वेदना होत आहेत आणि गुप्तांगाला गंभीर इजा झाल्याने ती आयसीयूमध्ये जीवनाशी लढा देत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणारे माणूस असू शकत नाहीत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी."

मुलगी घराबाहेर खेळत असताना तेथून तिला घेऊन गेले

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती, तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दुपारी साडेचार वाजता मुलगी घरी परतली तेव्हा तिने तिच्या आईकडे वेदना होत असल्याची तक्रार केली. मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

बालकल्याण समितीच्या समुपदेशनानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. आरोपींवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT