Rajnath Singh nephew accident news : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांचे अपघाती निधन झाले. मध्य प्रदेशातील इंदूरला परतत असताना एका बसने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. २९ वर्षीय प्रशांत सिंह यांच्या निधनाने मंत्री राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय प्रशांत सिंह मित्रांसोबत बाहेर गेले होते. देवासहून इंदूरला परतत असताना काळाने घाला घातला. प्रशांत यांनी तातडीच्या कामासाठी आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि ते खाली उतरले. आपले काम झाल्यानंतर प्रशांत कारमध्ये बसण्यासाठी येत असतानाच, एका भरधाव बसने त्यांना जोरात धडक दिली. बसची धडक इतकी भीषण होती की प्रशांत दूर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी प्रशांत यांना तात्काळ जवळच्याच अरबिंदो रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रशांत सिंह यांच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक भाजप नेते तात्काळ रुग्णालयात पोहोचले होते. सोनकच्छचे आमदार राजेश सोनकर यांच्यासह अनेक नेते रात्री उशिरा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
प्रशांत सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती भागातील गायघाट गावातील रहिवासी होते. त्यांचे वडील प्रदीप सिंह हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चुलत भाऊ आहेत; त्यामुळे प्रशांत सिंह हे राजनाथ सिंह यांचे पुतणे होते. प्रशांत हे कुटुंबात सर्वांचेच लाडके होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि शांत असल्याने लोकांसोबत त्यांची लगेच मैत्री व्हायची, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.
अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव बलिया येथे नेण्यात आला. तिथे कुटुंबाकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या अकाली निधनाने सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बलिया गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.