सात नवजात बालकांचा मृत्यू! रायपूरमधील घटना  Saam Tv
देश विदेश

सात नवजात बालकांचा मृत्यू! रायपूरमधील घटना

डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ केला. प्रकृती बिघडल्यामुळे या मुलांना ऑक्सिजनविना दुसर्‍या रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

वृत्तसंस्था

छत्तीसगडची मधील रायपूरच्या जिल्हा रुग्णालयात रात्री 8 वाजेच्या नंतर 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ केला. प्रकृती बिघडल्यामुळे या मुलांना ऑक्सिजनविना दुसर्‍या रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील hospital एका रूग्णाच्या कुटूंबाने सांगितले आहे की, 3 बालकांचा नाही तर 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले, मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी सात मुलांचे मृतदेह एक एक करून घेऊन जात असताना पाहिले आहे.

हे देखील पहा-

त्यातील एका बालकाचे वडील घनश्याम सिन्हा यांनी आरोप केला की, मुलाची प्रकृती बिघडली होती त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यावेळेस प्रकृती चिंताजनक होती. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता होती, परंतु ते दिले गेलेच नाही. रुग्णालय व्यवस्थापनातील लोकांकडे त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरची वारंवार मागणी केली. यादरम्यान, दाखल झालेल्या आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आणखीनच नातेवाईकांचा रोष वाढला. गोंधळाची माहिती मिळताच पंढरी पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

बालकांच्या केअर युनिटमध्ये Care Unit बराच वेळ नातेवाईकांचा गोंधळ सुरु होता. कुटुंबियांना कोणीही योग्य माहिती देण्यास तयार नव्हते. दोन ते अडीच तास सुरु गदारोळानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबीय शांत झाले. मृत पावलेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह घेऊन रात्री 11 वाजेपर्यंत कुटुंबीय परत गेले. हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या लोकांनी इतर नातेवाईकांना समजावण्यास सुरुवात केली. मुलांच्या मृत्यूबाबत रुग्णालय व्यवस्थापनाच्या वतीने असे सांगण्यात आले की मुलांचा मृत्यू सामान्य होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT