सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पडणार नाही- वरुन सरदेसाई

महाविकास आघाडी सरकार मधील विविध नेत्यांच्या पाठीमागे इडी, सीबीआय आणि आयटी सारख्या वेगवेगळ्या एजन्सीज लावून भाजपा सरकार पाडण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे. मात्र, याचा काहीही उपयोग होणार नाही.
सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाही- वरुन सरदेसाई
सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाही- वरुन सरदेसाई facebook/varun sardesai
Published On

आमच्या सरकार मधील विविध नेत्यांच्या पाठीमागे इडी, सीबीआय आणि आयटी सारख्या वेगवेगळ्या एजन्सीज लावून भाजपा महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे. मात्र, या सर्व एजन्सीजचा काहीही उपयोग होणार नाहीच मात्र, यामुळे महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत होईल आणि हे सरकार सुखरुपरित्या पाच वर्षे चालेल असं मत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी नागपुरमध्ये व्यक्त केल आहे. No matter how hard the opposition tries to overthrow the government, the government will not fall

आजपासून नागपूरातून Nagpur युवासेनेचा Youth पदाधिकारी संपर्क दौरा Contact सुरु झाला आहे. यावेळी वरुन सरदेसाई Varun Sardesai माध्यमांशी बोलत हेते. युवा सेनेचा हा नागपुर संपर्क दौरा आहे तसेच या दौऱ्याचा उद्देश नागपुर भागातील संघटन Organization मजबूत करण्याचा प्रयत्न असून प्रत्येक निवडणूकीला युवा सैनिक हा तयारच असतो, असंही ते या वेळी म्हणाले.

सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाही- वरुन सरदेसाई
मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही - गोपीचंद पडळकर

पूर्व नागपूरात वरुन सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी Media बोलताना ते म्हणाले आमचे सरकार पाडण्यासाठी विरोधक रोज नवनविन प्रयत्न करत आहे. या मध्ये त्यांनी शवटचा प्रयोग म्हणून सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेतली पण याचा काहीही उपयोग होणार नाही आमंच महाविकास आघाडी सरकार MVA Goverment पाच वर्ष चालणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान यावेळी युवा सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते मात्र या बैठकीत अनेक युवा सैनिकांनी मास्क घातला नव्हता तर सोशल डिस्टनसिंगचही पालन करण्यात आलं नव्हतं.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com