Viral News  x
देश विदेश

Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

Viral News : एका रुग्णवाहिनीतून मृत व्यक्तीला नेले जात होते. ही रुग्णवाहिनी खड्ड्यावर आदळली आणि रुग्णवाहिनीला जोरदार झटका बसला. रुग्णवाहिनीतील रुग्णाने हालचाल केल्याचे लक्षात आले. त्यानंतर रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.

Yash Shirke

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करताना अनेकांना त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने पावसाळ्यात खड्ड्याची समस्या वाढल्याचे पाहायला मिळते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता देखील असते. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण खड्ड्यामुळे मृत व्यक्तीला जीवनदान मिळाल्याचे तुम्हाला माहिती आहे का? एका वृद्ध व्यक्तीला मृत घोषित करुन रुग्णवाहिनीतून नेले जात होते, तेवढ्यात रुग्णवाहिका एका खड्ड्यात आदळली आणि मृत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरु झाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, करनालजवळच्या निसिंग येथील ८० वर्षीय दर्शन सिंग ब्रार यांना चार दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ब्रार याचे शरीर अंत्यविधीसाठी रुग्णालयातून बाहेर नेण्यात आले. पार्थिव शरीर घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिनी एका खड्ड्यात आदळली. त्या धक्क्यानंतर ब्रार यांच्या नातवाला काहीतरी जाणवले.

दर्शन सिंग ब्रार यांनी हात हलवल्याचे त्यांच्या नातवाच्या लक्षात आले. नातवाने आश्चर्यचकीत होऊन ब्रार यांना तपासले. तेव्हा त्याला ब्रार यांचे हृदयाचे ठोके ऐकू आले. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिनी दुसऱ्या रुग्णालयाच्या दिशेने वळवण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रार जिवंत असून श्वास घेत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने ब्रार यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करनालमधील एनपी रावल रुग्णालयात दर्शन सिंग ब्रार यांना दाखल करण्यात आले. रावल रुग्णालयातील डॉक्टर नेत्रपाल यांनी या प्रकरणाची माहिती दिली. रुग्णाचा मृत्यू झाला होता असे आम्ही म्हणू शकत नाही. जेव्हा त्यांना आमच्याकडे आणण्यात आले, तेव्हा ते श्वास घेत होते. ब्रार यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, असे डॉक्टरांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

SCROLL FOR NEXT