Rescue teams at the blast site in Silvassa after a deadly nitrogen gas cylinder explosion in a warehouse. 
देश विदेश

दादरा नगर हवेलीत मोठी दुर्घटना! नायट्रोजन गॅसच्या गोदामात स्फोट, ४ ठार; ५ जखमी

Major Explosion in Dadra Nagar Haveli: दादरा आणि नगर हवेलीतील सेल्वस येथील नायट्रोजन वायूच्या गोदामात सिलेंडर भरताना मोठा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातील सेल्वस येथे शनिवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. देमानी रोडवरील एका गोदामात नायट्रोजन गॅस सिलेंडर भरत असताना मोठा स्फोट झाला असून यात ४ जणांचा मृ्त्यू झाला आहे, तर पाचहून अधिक जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी गोदामात कामगार नायट्रोजन वायूचे सिलिंडर भरत होते. अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे गोदामाच्या पूर्णपणे जमिनीदोस्त झाले. आजूबाजूच्या परिसरातही जोरदार कंपने जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशत पसरली.

स्थानिकांच्या मते, स्फोटाचा आवाज ३० मीटर अंतरापर्यंत ऐकू आला. जवळून जाणारी शाळकरी मुले आणि स्थानिक रहिवासी मोठ्या आवाजाने घाबरले. काही लोकांना तर भूकंपासारखे धक्के जाणवल्याचेही सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि अग्निशमन दल घटनास्थाळी दाखल झाले. बचाव आणि मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार, मृतांमध्ये गोदामाच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक तपासात सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले असून, सिलेंडर भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणाच्या व्याप्तीची चौकशी करत आहे, ज्यामुळे हा मोठा अपघात घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT