Central government employees await DA hike announcement as delay raises hopes of 4-month arrears payout. saam Tv
देश विदेश

डीएची घोषणा झाल्यावर ४ महिन्याचा एरियर मिळणार? केंदीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार परिणाम

DA Hike Delay Impact On April Salary India: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या घोषणेला उशीर झाल्यामुळे एप्रिलच्या पगारावर परिणाम होण्याची शक्यता.

Omkar Sonawane

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात होणाऱ्या वाढीची प्रतीक्षा आता अधिकच लांबली आहे. एप्रिल महिला सुरू होऊन 10 दिवसाहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारचे मार्च महिन्यात होळीच्या आसपास डीए वाढीची घोषणा करते. ही वाढ वर्षाच्या पहिल्या सहमाहीसाठी ( जानेवारी ते जून) लागू असते. मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या पगारात वाढीव रक्कम आणि जानेवारी फेब्रुवारीची थकबाकी मिळून येते. मात्र यावेळी या घोषणेला विलंब झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मे महिन्याच्या पगाराची वाट पाहावी लागू शकते. काही सरकारी विभागांमध्ये पगाराची गणना मागील महिन्याच्या 15 तारखेपासून केली जाते. अशा स्थितीत एप्रिलमध्ये घोषणा न झाल्यास मे महिन्याच्या पगारात जानेवारी, फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल अशा 4 महिन्यांची थकबाकी एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे.

तज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा DA घोषणेला नक्कीच विलंब आहे. बँकबाजारचे CEO आधिल शेट्टी ययांच्या मते हा विलंब प्रशासकीय प्रक्रिया आणि आठव्या वेतन आयोगाच्या फ्रेमवर्ककडे होणाऱ्या बदलामुळे असू शकतो. नवीन वेतन संरचना आणि महागाईच्या आकडेवारीचा ताळमेळ बसवण्यासाठी हा लागत असावा. सध्याच्या माहितीनुसार डीएमध्ये २ ते ३ टक्क्यांची किरकोळ वाढ होऊ शकते. ज्यामुळे एकूण डीए ६० ते ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT