Cyclone Mocha Saam tv
देश विदेश

Cyclone Mocha: चक्रीवादळाला 'मोचा' नाव कोणी दिलं? काय आहे त्यामागची रंजक माहिती?

देशावर मोचा नावाचं चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे

Vishal Gangurde

Cyclone Mocha Update: देशातील वातावरणात अनेक बदल दिसून येत आहे. देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन आहे. याचदरम्यान, देशावर मोचा नावाचं चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे . हे वादळ ६ मे ते ८ मे या काळात धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

देशावरील या अस्मानी संकटाला मोचा नाव कोणी दिलं? चक्रीवादळाला असं नाव कोणी आणि का दिलं? त्यामागची रंजक माहिती समोर आली आहे. जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिकच्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे.

या यादीमध्ये देशांची नावे आहेत. यातील देश वादळाला नाव सुचवतो. या देशांच्या यादीमध्ये भारताचाही सामावेश आहे. मात्र, भारताने वादळाला नाव सुचवलेलं नाही. मोचा नावाच्या चक्रीवादळाला एका संघाने नाव दिलं आहे. या संघातील देशाला एकाच वेळी एकाच चक्रीवादळाला नाव देता येतं. मोचा नाव हे येमेनने सुचवलं आहे.

येमेन या देशाने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या 'मोचा' या बंदराच्या नावावरुन सुचवलं. त्यामुळे येमेन देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे.

हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?

आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, 'मोचा'चक्रीवादळ मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येईल असा अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीस दक्षिण बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत दिसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT