Pune Rain Update: पुण्यात येलो अलर्ट, पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Pune News : पुण्यात येलो अलर्ट, पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Pune Rain Update
Pune Rain Updatesaam tv

Weather News : पुण्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे.

पुणे आणि परिसरात गुरुवारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली होती. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती पुणेकरांना झाली.

Pune Rain Update
FD वर ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहे 'ही' बँक, मात्र इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर ही परिणाम होताना दिसून येत आहे. यातच शुक्रवारी शहरात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  (Latest Marathi News)

कर्नाटकात चक्राकार वाऱ्यांची स्थिती

हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात तुरळक भागात पावसाची शक्यता कायम आहे. तर शहर आणि परिसरात रविवारपर्यंत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Rain Update
Raj Thackeray News: रत्नागिरीत ठाकरेंची तोफ धडाडणार! खोके, राजीनामा अन् गद्दारी.. सभेआधीच टीझरमधून विरोधकांवर हल्लाबोल

Marathwada Vidyapeeth Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

या प्रणालीमुळे रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत त्याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com