Raj Thackeray News: रत्नागिरीत ठाकरेंची तोफ धडाडणार! खोके, राजीनामा अन् गद्दारी.. सभेआधीच टीझरमधून विरोधकांवर हल्लाबोल

Raj Thackeray Rally Teaser: सगळेच आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू… असं यामध्ये म्हटलं आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv

Raj Thackeray Rally In Ratnagiri: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होत आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर संध्याकाळी ७च्या सुमाराला राज यांचं भाषण होणार आहे. सध्या चर्चित असलेल्या बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

त्याआधी राज ठाकरे (Raj Thakckeray) यांच्या या सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामधून राज्याच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray Latest News
Maratha Vanvas Yatra सुरु, मराठा क्रांती ठोक माेर्चाने दर्शविला विराेध; तुळजापूरात तणाव

दोन्ही ठाकरे आज रत्नागिरीत...

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे (Udhav Thackeray) बारसू दौऱ्यावर आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील 6 मे रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी कोकणात दोन ठाकरी तोफा धडाडतांना दिसणार आहे. रत्नागिरीमध्ये या सभेच्या पूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांची जाहीर सभा ही रत्नागिरीतील (Ratnagiri) प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार आहे. कालच राज ठाकरे हे रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे सध्या रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात थाबंले आहे.

सभेचा टीझरही प्रदर्शित...

राज ठाकरे यांच्या सभेआधी मनसेकडून (MNS) एक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मनसेनं सध्याच्या राज्यातील राजकारणावर चांगलाच समाचार घेतला आहे. याच्यात आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप, सूडभावना, राजकीय चिखल, खोके, उठाव, नाराजीनामा, राजीनामा, फोडाफोडी, गद्दारी, गलिच्छ भाषा आणि बंड या शब्दांचा वापर करण्यात आल्याचं दिसत आहे. तर राज ठाकरेंच्या आवाजात सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू… असं म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com