
- कैलास चाैधरी
Dharashiv News : मराठा आरक्षण (maratha reservation) मिळावे यासाठी सरकारचे लक्ष वेढण्यासाठी आजपासून (शनिवार) तुळजापूर ते मंञालय या मराठा वनवास याञेस (tuljapur to mantralaya maratha vanvas yatra) तुळजापूरात प्रारंभ झाला. या यात्रेतील कार्यकर्त्यांनी आरक्षण आमचे हक्काचे..., आरक्षण द्या अन्यथा खूर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी केली. (Maharashtra News)
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री केवळ वांझ बैठका घेणार असतील तर त्यांना सळो की पळो करु असा इशारा धाराशिव येथील मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला हाेता. आरक्षण मिळावे यासाठी आजपासून (ता. ६ मे) तुळजापूर ते मंञालय मराठा वनवास याञा काढण्याचा निर्धार केला हाेता.
या यात्रेस आज तुळजापूरात प्रारंभ झाला. आई तुळजाभवानीचा जागर करून तुळजापूरातुन वनवास याञेला प्रारंभ करण्यात आला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान या याञेला प्रारंभ होताच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत यात्रेचा निषेध नाेंदविला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.