Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंची कार्यपद्धत... खूद्द शरद पवारांनीच लिहलं आहे, आणखी काय हवं : दीपक केसरकर

आज उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पास विराेध दर्शविणा-या ग्रामस्थांची भेट घेतली.
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery Project
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery ProjectSaam tv

- रणजीत माजगावकर

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (uddhav thackeray visit to barsu) हे विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी बारसूला जाताहेत. त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही असे मत काेल्हापूरचे पालकमंत्री, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. (Breaking Marathi News)

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery Project
Karnataka Election : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या Car मध्ये 88 लाखांची राेकड सापडली; पाेलिस तपास सुरु

केसरकर म्हणाले उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे व्हावे हे पत्र देवून सुचवलं होतं. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र देऊन पदावरुन गेल्यानंतर स्वतः विरोध करीत आहे. म्हणूनच त्यांच्या (ठाकरेंच्या) कार्यपद्धतीबद्दल शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिले आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणे गरजेचं नाही असा चिमटा केसरकरांनी ठाकरेंना काढला.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery Project
Ajit Pawar यांना चिमटा... व्यंगचित्र पुर्ण हाेताच Raj Thackeray म्हणाले, पुढं काय लिहू गप्प बसा (पाहा व्हिडिओ)

दरम्यान कोकणात कुठलेही मोठे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण कोकण मुंबई आणि गोवा राज्यावर अवलंबून आहे. या परिसरातील तरुणांना रोजगार हवे आहेत. त्यासाठी कोकणात रिफायनरी प्रकल्प मार्फत अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे यात कोणतेही राजकारण करू नये असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com