Cyclone Michaung hit Andhra Pradesh and Tamil Nadu 17 died due to heavy rains Saam TV
देश विदेश

Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळाचा दोन राज्यांना तडाखा; अनेक इमारती पाण्याखाली, आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

Michaung Cyclone Updates: मिचौंग चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. मुसळधार पावसामुळेपूरस्थिती निर्माण झाली असून अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.

Satish Daud

Michaung Cyclone Latest Updates

बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर मिचौंग चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली आहे.चक्रीवादळात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक ठिकाणी घरावरील छतेही उडाली असून झाडांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय अनेक जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूसोबत आंध्र प्रदेशाला देखील मिचौंग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला आहे. 'मिचौंग'मुळे कृष्णा जिल्ह्यात तुफान पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे मछलीपट्टणम, कोडुरू, क्रुथिवेन्नू, नागयलंका, अवनीगड्डा गावांमधून ६०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मिचौग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने सोमवारी अनेक जिल्ह्यांमधील शाळा तसेच कॉलेजला सुट्टी जाहीर केली.

आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रशासनावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारकडून बाधित जिल्ह्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

IndW vs SAW Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप फायनल लाइव्ह कुठे बघाल फ्री? वाचा

Gauri Kulkarni: गोऱ्या गोऱ्या रंगाची 'ही' अभिनेत्री कोण?

Maharashtra Live News Update : मनमाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी

Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

SCROLL FOR NEXT